• Advertisement
  • Contact
More

    सावली तालुक्यातील मंगरमेंढा येथील तरुनाचा मृतदेह आढळला
    गोसेखुर्द नहरात

    सावली तालुक्यातील मंगरमेंढा येथील  प्रशांत दुमाजी मेश्राम वय 20 वर्ष हे
    मागील दोन दिवसा पूर्वी  पाथरी- भानापुर ते मंगरमेंढा या मार्गावरून बेपत्ता झाल्याची माहिती सर्वत्र देण्यात आलेली होती. तसेच पाथरी पोलिसांना ही सूचना देण्यात आली होती. त्यामुळे  प्रशांत चा सर्वत्र शोध सुरू असतानाच आज दिनांक 9 ला सकाळी  त्याच परिसरातील गोसेखुर्द च्या नहरामधील गेट जवळ जीन्स- लाल-गुलाबी शर्ट  घातलेला असलेला मृतदेह मिळाला याची माहिती परीवार ला मिळताच त्यानीं घटना स्थळी बघता तो मृतदेह प्रशांत चा असल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भात पाथरी पोलीस स्टेशन ला माहिती देण्यात आलेली असून पोलीस पंचनामा करून पुढील तपास करणार आहे.मात्र प्रशांत चा मृत्यू कसा झाला हे मात्र गुलदस्त्यात असून पोलीस याचा तपासात उलगडा करणार आहे.