• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  सावली तालुक्यात डेंग्यूमुळे बापलेकाचा मृत्यू

  चंद्रपूर : सावली तालुक्यातील चिकमारा गावात डेंग्यू आजाराने थैमान घातले आहे. दोन दिवसांच्या अंतराने बापलेकाचा मृत्यू झाला तर गोंडपिपरी तालुक्यातील तारसा येथील रंगकर्मी ताराचंद उराडे यांचाही डेंग्यूने मृत्यू झाला.
  चिकमारा गावातील जीवनदास ऋषी खोब्रागडे (४५) यांचा ११ ऑगस्टला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. तर दोनच दिवसानी १३ ऑगस्टला त्यांचा १३ वर्षीय मुलगा कुणाल याचाही मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. गावात
  घरालगतच असलेल्या अशोक मुखरू मेश्राम (४०) याचाही ११ ऑगस्टला डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे गावात या आजाराची दहशत पसरली आहे.
  आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. घरातील कमावता एकुलता एक मुलगा व नातवाचे निधन झाल्याने वृद्ध आई-वडील व पत्नीवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तारसा येथील रंगकर्मी, कलावंत ताराचंद उराडे याचा दोन दिवसांपूर्वी डेंगूच्या आजाराने मृत्यू झाला. तर त्याची पत्नी व मुलगी चंद्रपूर येथे खासगी रुग्णालयात दाखल आहे.