• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    सिंदेवाही वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
    शेतातील काम आटोपून घराकडे येतांना घडली घटना

    सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या नवेगाव (लोनखैरी) येथील जंगल परिसराला लागून असलेल्या शेतात काम करून घराकडे परत निघालेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. यात शेतकरी ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६.३० वा. सुमारास घडली. काशिनाथ पांडूरंग तंलाडे (६२) रा. नवेगाव लोनखैरी असे मृतकाच नाव आहे. शेतातील काम आटोपून तलांडे घराकडे येण्यासाठी म्हणून बैलगाडीला बैल जुपत असताना एक बैल जंगलाच्या दिशेने गेला. बैलाला आणण्यासाठी काशिनाथ तलांडे जंगलाकडे गेले असता झुडूपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. लगेच शेतात जवळच असलेल्या मुलाने धाव घेतली. काही कालावधीत वडिलांनी प्राण सोडले. वनविभागाच्या वतीने मृतकाच्या कुटुंबाला तत्काळ २५ हजाराची मदत देण्यात आली.