• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  २० टन धान्याचा ट्रक चोरणाऱ्यास एलसीबीच्या पथकाने ठोकल्या बेड्या
  शासकीय धान्याचा होता ट्रक, १५ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

  शासकीय धान्य भरलेला ट्रक चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पडोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने नाकाबंदी करून बल्लारपूर मार्गावरून ट्रक आणि चोरट्यास ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ट्रकमध्ये चार लाख रुपये किमतीचे २० टन धान्य होते. दिगांबर बापूराव केंद्रे (वय २६, रा. वंजारी गुडा, तेलंगणा) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. हि कारवाई मंगळवारी (ता. २७) करण्यात आली.
  जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांत ट्रक चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अशीच एक घटना २६ जुलैला रात्री ८ वाजताच्या सुमारास पडोली पोलीस ठाणे हद्दीत घडली. सुमारे चार लाख रुपये किमतीचे २० टन धान्य भरलेला एमएच ३४ बीजी ३९०७ क्रमांकाचा ट्रक चोरट्याने चोरी केल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर पडोली पोलीस ठाण्यात ट्रक चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने दोन पथके गठीत करून ट्रक चोरट्याचा शोध सुरु केला.
  तपासात ट्रक बल्लारपूर मार्गाने गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. विसापूर फाटा टोलनाक्यावर ट्रक थांबवून तपासणी केली. यावेळी चालकाने ट्रक चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रक जप्त करून चोरट्यास अटक केली. सादर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, राजेंद्र