• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  ३७ लाखांची चोरी करणारे ५ अटकेत
  स्थानिक गुन्हे शाखा, रामनगर पोलिसांची कारवाई

  चंद्रपूर शहरातील तुकुम शिवाजीनगरातील प्रकाश जयस्वाल यांच्या घरी परवा रात्री ३७ लाखांची चोरी करण्यात होती. या घटनेतील चोरट्यांना बेड्या टोकण्यात पोलिसांना यश आले.  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने २, तर उप विभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांचा मार्गदर्शनातील रामनगर पोलिसांचा गुन्हे शोध पथकाचे प्रमुख अब्दुल मलिक व हर्षल ऐकरे यांचा पथकाने ३ चोरट्यांना अटक केली आहे.
  प्रकाश जयस्वाल यांच्याकडे वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या  युवकाला ६ महिन्यांपूर्वी कामावरून काढण्यात आले. त्यामुळे हा युवक आणि जयस्वाल यांच्यात घटनेच्या आदल्या दिवशी पैशावरून वाद झाला होता. त्यानंतर सादिक याने आपल्या सहकाऱ्यांसह चोरीचा प्लॅन तयार केला.
  त्यानुसार जैस्वाल यांचा घरी कुणीही नसल्याची संधी साधून घरात प्रवेश केला आणि घरातील १५ लाखांची रोख आणि ७० तोळे सोन्याचे दागिने असा ३७ लाखांचा ऐवजावर हातसाफ केला
  या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने दोघांना तर रामनगर गुन्हे शोध पथकाचे प्रमुख अब्दुल मलिक व हर्षल ऐकरे यांचा पथकाने तीन चोरट्यांना अटक केली आहे. शहरातील गोल बाजार परीसरातुन दोन, गडचिरोली येथून एक आणि नागपुरातून दोघांना ताब्यात घेण्यात आले