• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    चंद्रपूर जिल्ह्यात दहावीच्या निकाल ९५.९७ टक्के – बल्लारपूर अव्वल, तर जिवती तालुका सर्वांत कमी

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी  जाहीर करण्यात आला. जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९५.९७ इतकी आहे. यंदाच्याही निकालात मुलींनीच बाजी मारली. मुलींच्या निकालाची टक्केवारी ९७.४३, तर मुलांच्या निकालाची टक्केवारी ९४.६० इतकी आहे. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. दहावीच्या परीक्षेसाठी २८ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी २८ हजार ५६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात मुले १४ हजार ७५४, तर १३ हजार ८११ मुलींचा समावेश आहे. त्यातील २७ हजार ४१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद स्कुल अँड   ज्युनिअर कॉलेज ब्रह्मपुरीची विद्यार्थिनी स्नेहा यशवंत पंचभाई आणि नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी सुभाष उरकुडे यांना प्रत्येकी ९७.४० टक्के, तर सेंट मायकल्स इंग्लिश स्कूल चंद्रपूरचा विद्यार्थी आयुष दिनेश आवळे याने ९६.६० गुण प्राप्त केले आहे.