• Advertisement
  • Contact
More

    14 तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या शुन्यावर

    13 कोरोनामुक्त, 1 पॉझिटिव्ह, ॲक्टीव्ह रुग्ण शंभरच्या खाली

    चंद्रपूर, दि.26 जुलै : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. सोमवारी 15 पैकी 14 तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या शुन्यावर आली असून केवळ वरोरा तालुक्यात एक पॉझेटिव्ह रुग्ण आढळून आला. तसेच गत 24 तासात 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सोमवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

    आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 1 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 0, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मुल 0, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 1, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

    जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 979 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 354 झाली आहे. सध्या 91 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 7 हजार 185 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 18 हजार 247 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1534 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

    प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

    Leave a reply

    Please enter your comment!
    Please enter your name here