• Advertisement
 • Contact
More

  आदर्श शाळेतील स्काऊट -गाईड व राष्ट्रीय हरित सेना विभागाद्वारे कारगील विजयी दिनाचे आभासी पद्धतीने आयोजन.

  विध्यार्थीनी घरी राहून राष्ट्रगीत म्हणून दिली सैनिकांना मानवंदना.

  राजुरा 26 जुलै

  कारगीलच्या लढाईत भारताने मिळवलेला विजय ” कारगील विजय दिवस ” म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कारगीलच्या लढाईत शहीद झालेल्या वि्रांच्या आठवणीं जागवल्या जातात. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रति कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस आहे. 26 जुलै 1999 मधे भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय राबवून पाकिस्तानवर विजय प्राप्त केला होता. भारतीय सैन्याची ही विरगाथा नव्या पिढीला प्रेरणादायी ठरावी तसेच भारतीय सैन्याच्या या साहसी, पराक्रमाला मानवंदना देण्याकरिता आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथील स्काऊट -गाईड युनिट व आदर्श हायस्कुल च्या राष्ट्रीय हरित सेना (इको क्लब ) च्या विध्यार्थीनी घरी राहून राष्ट्रगीत गायन करून व ऑपरेशन विजय याविषयीं माहिती घेऊन भारतीय वीर सैनिकांना मानवंदना दिली.
  स्काऊट युनिट लीडर तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांच्या मार्गदर्शनात आभासी पद्धतीने हा उपक्रम राबाविण्यात आला. यावेळी आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर, आदर्श प्राथमिक च्या मुख्याध्यापीका नलिनी पिंगे, गाईड व कब -बुलबूल युनिट लीडर सुनीता कोरडे, अर्चना मारोटकर, वैशाली टिपले, रोशनी कांबळे, स्काऊट लीडर रुपेश चिडे आदींचे सहकार्य लाभले. विध्यार्थीनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या उपक्रमात सहभागी सर्व विध्यार्थीचे बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबणानी, सचिव भास्कर येसेकर, सहसचिव शंकरराव काकडे, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार, संचालक लक्ष्मणराव खडसे, मधुकर जानवे, अविनाश निवलकर, मंगला माकोडे आदिनी अभिनंदन केले.

  Leave a reply

  Please enter your comment!
  Please enter your name here