• Advertisement
 • Contact
More

  आनंदवन येथे आरोग्य तपासणी तथा वाहतूक जागरुकता शिबीर कांचनी फार्मर्स प्राड्युसर कंपनीचा उपक्रप

  कृषिक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कांचनी फार्मर कंपनीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्य सदर कंपनी व रोटरी क्लबच्या वतीने आनंदवन येथे वाहनचालकांची आरोग्य तपासणी तथा वाहतूक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
  यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक निलेश पांडे, वाहतूक परिवहन निरीक्षक जीलावार, कृ.ऊ.बा. समिती सभापती राजु चिकटे, बघेल, बंडू दरेकर, नितिन टोंगे, बळीराम डोंगरकार आदींची उपस्थिती होती.
  यावेळी कांचणी फार्मर प्राड्युसर सारख्या कंपन्या शेतकऱ्यांचे भविष्य घडवू शकते. असे प्रतिपादन आ.प्रतिभा धानोरकर यांनी केले.सदर कंपनीने कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालांचे खरेदी व्यवहार सुरू केल्याने तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांना जास्तीचा भाव मिळू लागल्याबद्दल कंपनीचे अभिनंदन केले. शिबिरात डॉ अनुप वासाडे, डॉ.निखिल लांबट, डॉ.विशाल चौखे, या तज्ञांनी वाहनचालकांची आरोग्यतपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन कंपनीचे संचालक यशवंत सायरे यांनी केले.
  कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुकेश माथनकर, संजय नारळे, निलेश ठावरी, प्रफुल धोबे, कुणाल धोबे, अमोल माथनकर, संदीप भोगेकर, विकास पायघन, संदीप पारखी, अनुप मेश्राम आदींनी सहकार्य केले.