• Advertisement
  • Contact
More

    राजुऱ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची तिसरी धाड – कृषी केंद्र परवाना नुतनीकरणसाठी ‘लाच’ घेतांना कृषी सहाय्यक व खाजगी इसम अटकेत

    सागर भटपल्लीवार – प्रतिनिधी —-राजुरा येथील  एका कृषी संचालकाच्या कृषी केंद्र धंदा परवाना नूतनीकरण करण्यासाठी दहा हजाराची लाच घेतांना एका खाजगी इसमाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.त्यांनी ही रक्कम कृषी सहाय्यक यांच्या सांगण्यावरून घेतली आहे.या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची २०  दिवसातील ही तिसरी धाड आहे.या तिन्ही कारवाईत चार लाचखोर जाळ्यात अडकले आहे. तक्रारदाराचे कृषी केंद्र असून या धंदा परवान्यांचे नुतनीकरण करण्यासाठी कृषी अधीक्षक कार्यालयातील कृषी सहाय्यक जया विजय व्यवहारे यांनी दहा हजाराची लाच मागितली.पण तक्रारकर्त्यांला लाच द्याची नसल्याने त्यांनी नागपुरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.विभागाने या संदर्भात कृषी सहाय्यक जया व्यवहारे यांच्याशी फोन करून पैसे मागितल्याची पडताळणी केली.लाचेची रक्कम गणपती कम्युनिकेशनचा मालक वैभव धोटे यांना देण्याचे सांगितले. यावरून विभागाने सापळा रचला व त्यात खाजगी इसम धोटे यांना दहा हजाराची लाच घेतांना अटक केली आहे.वैभव धोटे यांचे मुख्य मार्गावर आपले सरकार केंद्र असून याच केंद्रातुन कृषी केंद्र परवान्यांचे नूतनीकरण करण्यात येते.कृषी सहाय्यक व्यवहारे यांनी याच परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले व खाजगी इसमाला पैसे स्विकारताना रंगेहाथ पकडले.ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते,पोलीस उप अधीक्षक अविनाश भामरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, जितेंद्र गुरनेले,पोलीस उपनिरीक्षक रमेश दुपारे,नरेश ननावरे,रोशन चांदेकर, राविकुमार ढेंगडे, वैभव गाडगे,मेघा मोहूर्ले,पुष्पा कचोळे, सतीश सिडाम यांनी केली आहे.