• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    आधार साठी नागरिकांना माराव्या लागतात हेलपाटे आधार केंद्र असूनही निराधार ,बरेचशे केंद्र बंद

    मूल :- (अमित राऊत )

    मूल येथील बरेचशे आधार केंद्र बंदच असल्याने नागरिकांना सेवेअभावी हेलपाटे मारावे लागत आहे.स्थानिक गावात आधार केंद्रांचीच निराधारासारखी अवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.या व्यतिरिक्त नवीन आधार केंद्र मूल मध्ये सुरू करावे अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.
    आधार कार्ड हे आजच्या घडीला सर्वांसाठी महत्वाचे ओळखपत्र बनले आहे.बॅंकेत खाते उघडण्यासाठी,रेशन दुकानावर धान्य घेण्यासाठी,पॅनकार्ड साठी तथा इतर आवश्यक सेवेसाठी आधार कार्ड असणे आवश्यक झाले आहे.तसेच ते अपडेट असणे सुदधा महत्वाचे ठरले आहे.परंतु स्थानिक मूल मध्ये नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेले आधार केंद्रच निराधारासारखे झाले आहे. येथील तहसिल कार्यालयात दोन आधार केंद्र आहेत.त्यापैकी एका आधार केंद्रातील सेवा काही कारणास्तव बंद अवस्थेत आहे. संबधितांनी पर्यायी व्यवस्था न ठेवल्याने तहसिल कार्यालयातील एका केंद्रा वर नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळते. आधारच्या तपसिलासाठी बराच वेळ लागत असल्याने येथे आलेल्या नागरिकांना आल्या पावली वापस फिरावे लागत आहे. स्थानिक पोस्ट ऑफीस कार्यालयातील आधार केंद्र कोरोना संसर्गाच्या कारणावरून मागील दोन तीन महिण्यांपासून बंद असल्याचे बोलल्या जाते. येथील एका खाजगी बॅंकेत असलेली आधार केंद्राची हीच अवस्था असल्याचे सांगण्यात येते. आधार सेवाच निराधारासारखी वावरत असल्याने नागरिकांनी आधार साठी जावे कुठे असा प्रश्न विचारल्या जात आहे. तहसिल कार्यालयात पुन्हा एक नवीन आधार केंद्र सुरू करावे अशी मागणी होत आहे. यासाठी तालुका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.स्थानिक मूलची लोकसंख्या पंचवीस हजाराच्या वर असून तालुक्याची लोकसंख्या एक लाखाच्या वर आहे. त्यामुळे तहसिल कार्यालयात नवीन आधार केंद्राची मागणी येथे होत आहे. ग्रामीण भागात मोजक्याच ठिकाणी आधार केंद्र आहेत. विदयार्थी आणि नागरिकांच्या सेवेसाठी शहर आणि ग्रामीण भागात आधार केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.