• Advertisement
  • Contact
More

    आत्मा अंतर्गत बाखर्डी येथे अन्नद्रव्य व किडरोग व्यवस्थापन कार्यक्रम ४०० शेतकऱ्यांना मोफत निविष्ठा वाटप

    मारडा ता१४ :- तालुका कृषी अधिकारी कोरपना व बाखर्डी फार्मस प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने बाखर्डी येथे मंगळवारला सायंकाळी ४ वाजता जिल्हा खनिज प्रतिष्ठान चंद्रपूर अंतर्गत कापूस पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व किडरोग व्यवस्थापन करीता निविष्ठा वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे
    यांच्या हस्ते करण्यात आले.
    यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे तालुका कृषी अधिकारी रवींद्र डमाळे सरपंच अल्का पायपरे निमणी उपसरपंच उमेश राजूरकर एफ पी ओ संदीप काकडे प्रक्षेत्र अधिकारी शंकर आत्राम माजी सरपंच तानेबाई भोयर कृषी पर्यवेक्षक रमेश मुंडे कृषी सहाय्यक बालाजी बेवनाळे बाबाराव तिडके अशोक झाडे रंजित गौरकार विठ्ठल पानघाटे आदी उपस्थित होते.
    भाऊसाहेब बऱ्हाटे म्हणाले की शेतकऱ्यांनी पिकांवर ४५ दिवसाच्या कालावधीत कोणतीही रासायनिक किटकनाशकाची फवारणी न करता जैविक किटकनाशकाची फवारणी केली पाहिजे जेणेकरून मित्र किटकांचा बचाव होईल व शत्रु किटकांचा नाश होईल तसेच शेतकऱ्यांनी आत्मा अंतर्गत गट स्थापन करावे हवामान पिक उत्पादन तंत्रज्ञान किड आणि रोग नियंत्रण या संदर्भातील माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषीक ऍप्स डाउनलोड करून घ्यावे असे आवाहन केले.
    बाखर्डी फार्मस प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कडून बाखर्डी निमणी लखमापूर तळोधी नवेगाव या गावातील ४०० शेतकऱ्यांना कापूस पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी अन्नद्रव्य व किडरोग व्यवस्थापन करिता मोफत निविष्ठा वाटपकरण्यात आल्या.
    कार्यक्रमाचे संचालन संदीप काकडे तर आभार पंकज घाटे यांनी मानले यावेळी बाखर्डी परिसरातील शेतकरी उपस्थित होते