• Advertisement
 • Contact
More

  राज्यस्तरीय भरारी पथकाची कृषी केंद्राला भेट ; राजुरा तालुक्यातील कृषी केंद्राला 2.27 लाखाचा विक्रीबंद आदेश

  धम्मशील शेंडे, प्रतिनिधी
  चंद्रपूर दि.7 जुलै: दिनांक 30 जून व 1 जुलै 2021 या कालावधीत राज्यस्तरीय भरारी पथक चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सदर दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील चांडक अॅग्रो सेंटर या कृषी केंद्राला अचानक भेट देत पाहणी केली. सदर कृषी केंद्रातील कीटकनाशके, खते व बी बियाणे परवान्याची तपासणी केली असता तपासणीअंती कीटकनाशके परवान्यात समाविष्ट नसलेल्या त्रुटीनुसार कंपनीच्या निविष्ठांना 2 लाख 27 हजार रुपयाचे विक्री बंद आदेश ठोठाविण्यात आला.
  तसेच संबंधित कृषी केंद्रातील कीटकनाशके व खतांचे नमूने प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश कृषी विभागाला दिले. त्यानंतर सदर पथकाने जिल्हा मृद चाचणी अधिकारी कार्यालयाला भेट देत पाहणी केली व जिल्ह्यातील मृदु नमूने तपासणीसाठी आले आहे त्याची त्वरित तपासणी करून शेतकऱ्यांना ते वितरित करावे तसेच गाव सुपीकता निर्देशांक अहवाला नुसार खतांची मात्रा संबंधित माहिती शेतकऱ्यांना द्यावी अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
  यावेळी, कृषी आयुक्तालयाचे कृषी उपसंचालक अशोक बाणखेले, कृषी अधिकारी प्रविणकुमार कदम याच्यांसमवेत चंद्रपूर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षक श्री. मडावी , राजुराचे पंचायत समिती कृषि अधिकारी श्री. ढवस उपस्थित प्रामुख्याने उपस्थित होते.
  00000