• Advertisement
  • Contact
More

    ‘एक गाव एक वाण ‘ या योजने अंतर्गत शेगावात शेतकरी प्रशिक्षण

    चंद्रपुर :- संयुक्त ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी शेगाव बु. व तालुका कृषी अधिकारी, वरोरा. आणि जिल्हा व्यवस्थापक कार्यालय महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट प्रकल्प ‘ एक गाव एक वाण ‘ या योजने अंतर्गत धान उत्पादक शेतकऱ्यांचे शेतकरी प्रशिक्षण संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. भाऊसाहेब बराटे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर) हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. रवींद्रजी मनोहरे ( प्रकप उपसंचालक , चंद्रपूर) अजय फुलझेले ( जिल्हा व्यवस्थापक, महाबीज), मा. नितीन गजबे ( किड रोग श्री शास्त्रज्ञ) , मा. मनोज जोगी (वनस्पती किड रोग शास्त्रज्ञ) शेगाव मंडळ कृषी अधिकारी मा. विजय काळे , मा. विशाल घागी (तालुका व्यवस्थापक, आत्मा) या सर्व कृषी अधिकाऱ्यांनी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन व शासनाच्या विविध योजने बाबत मार्गदर्शन केले.

    श्री. रवींद्र साखरकर ( संयुक्त ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी सचिव ) यांनी कंपनीचे कार्य व कंपनीची पुढील वाटचाल याबाबत माहिती दिली.शेगाव मंडळ मधील संपूर्ण कृषी सहाय्यक व संयुक्त ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चे सर्व संचालक व शेतकरी बांधव व शेतकरी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.