• Advertisement
 • Contact
More

  अज्ञात महिलेच्या शोधासाठी बचाव पथकाची मोहीम सुरु.

   नदीच्या पुलावर सिसिटीवी कॅमेरा लावा- विवेक बोढे यांची मागणी.

  घुग्घुस प्रतिनिधी- नौशाद शेख सर्च टि, व्ही,

   4 सप्टेंबर रोजी दुपारी 3:30 वाजता दरम्यान घुग्घुस-बेलोरा रस्त्यावरील वर्धा नदीच्या बेलोरा पुलावरून एका अज्ञात महिलेने नदीत उडी घेतली.
    घुग्घुस पोलिसांनी चंद्रपूर येथून बचाव पथकास रविवारी 5 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता बोलाविले. घुग्घुस पोलीस स्टेशनचे पोहवा. रंजित भुरसे, मनोज धकाते, स्वप्नील बोंडे व चंद्रपूर बचाव पथकाचे पोहवा. बोट चालक अशोक गर्गेलवार, मंगेश मत्ते, वामन नक्षीने, उमेश बनकर, सुजित मोगरे, गिरीश मरापे, दिलीप चव्हाण, अजित बाहे, रुपेश निरस्कर यांनी बोटीने अज्ञात महिलेची शोध मोहीम राबविली.
  ही माहिती मिळताच भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, हेमराज बोंमले, अजय आमटे, सुरेंद्र भोंगळे, असगर खान यांनी घटनास्थळी धाव घेतली.
   भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी प्रशासनाने या पुलावर सिसिटीवी कॅमेरा लावावा अशी मागणी केली.

  दरम्यान शनिवार 4 सप्टेंबर रोजी फिर्यादी मंगल तुळशीराम जुनघरी (45) रा. बहिरमबाबा नगर, घुग्घुस यांनी त्यांची पत्नी रविता मंगल जुनघरी (39) ही दुपारी 3 वाजता घरून निघून गेल्याची घुग्घुस पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली.