वरोरा – भद्रावती मतदार संघातील पॉली, आयटीआय, फायर इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाचा समावेश
चंद्रपूर : कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून वारंवार निर्बंध लागू करण्यात आले. लॉकडाउनच्या निर्णयामुळे आर्थिक आघाड्यांवर मोठे परिणामही झाले. उद्योग व्यवसायासह सर्व क्षेत्रांना मोठा फटका बसला. कोरोना महामारीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनामुळे ज्या पालकांचे निधन झाले, त्या पालकांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी घेतला आहे. ज्या पालकांचे छत्र हरपले आहे, अशा वरोरा – भद्रावती मतदार संघातील मुलांना पॉली डिप्लोमा, आयटीआय, फायर इंजिनिअरींग या अभ्यासक्रमात मोफत शिक्षण देण्यात देणार आहे.
दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटाने अनेक आव्हाने निर्माण केली आहेत. या दोन वर्षांच्या काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. एकाच कुटुंबातील आई व वडील अशा दोन कर्त्या व्यक्तींचाही मृत्यू झाल्याने या कुटुंबातील मुलांवर मोठे संकट कोसळले. पालकांचे छत्र हरपलेल्या अशा मुलांना शालेय शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारे अडचणी येऊ नये या हेतूने तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर अशा मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक मुलांना आता संपूर्ण शिक्षण मोफत मिळणार आहेत. अशा मुलांनी प्रफुल फुलगमकर ९८८१०१६७१४ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले आहे.
