• Advertisement
 • Contact
More

  अंगणवाडी महिलांच्या प्रश्नाला घेउन जिल्हा परिषदे समोर धरणा आंदोलन

  ■ अंगणवाडी महिलांच्या प्रश्नाला घेउन दुपारी जिल्हा परिषदे समोर धरणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात शिष्टमंडळाचे वतीने
  १) अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसाना सेवानिवृत्तीचा लाभ देण्यात यावा
  २) ज्या अंगणवाडया किरायाचे घरात आहे त्यांना नियमितपणे किराया देण्यात यावा..
  ३) अंगणवाडी मदतनिसांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या.
  ४) अंगणवाडीला पुरविण्यात येणारे साहीत्य अंगणवाडी केंद्रापर्यंत पोहचविण्यात यावे.
  ५) पोषन ट्रैकर मध्ये इंग्रजीतून माहिती भरण्याची सक्ती करण्यात येवू नये.
  ६) मासीक अहवाल तथा रजिस्टरचा पुरवठा करण्यात यावा
  ७) मोबाईल दुरुस्तीचे नावाखाली पैसे वसूत करण्यात येवू नये.
  अश्या विविध मागन्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
  या मागन्यांची तात्काळ सोडवणुक करण्यात यावी व या मागण्या शासनाशी संबंधित आहे. त्या सर्व मागण्या शिफारशीसह शासनाकडे पाठविण्यात याव्या. अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.