• Advertisement
  • Contact
More

    आष्टीत पठाण कुटुंबाचे सततधार पावसाने घर जमीनदोस्त जिवीतहानी टळली मात्र घरासह लाखो रुपयांचे नुकसान

    चामोर्शी  तालुक्यातील  आष्टी परीसरात आठ दिवसा पासून सततधार पाऊस पडत असल्याने आष्टी ग्रामपंचायत अंतर्गत राहत असलेले  हमीद नजीर खान पठाण यांचे घर पडून पूर्ण  जमीनदोस्त झाले आहे.  यात  लाखो रूपयांचे  नुकसान झाले असून  सुदैवाने कोणतीही  जिवित हानी झाली नाही  मात्र घरासह जीवनावश्यक वस्तू चे फार मोठया प्रमाणात नूकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच  जिल्हा परिषद सदस्य  रूपालीताई पंदिलवार यांनी घटना स्थळावर जावून घटनेची पाहणी केली.  हमीद पठाण हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होते या सततधार पावसामुळे राहते घर पूर्णपणे जमीनदोस्त होऊन  यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याने पठाण कुटुंबावर  मोठी आपत्ती निर्माण झाली आहे. करीता शासनाकडून या आपत्तीग्रस्त कुटुंबाला लवकरात लवकर नूकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन गडचिरोली जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई पंदिलवार यांनी दिले