• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    तेलंगाणातील धबधब्यातून युवक वाहून गेला


    चंद्रपूर :-
    तेलंगणातील आसीफाबाद जवळील तिर्यानी येथील धबधब्यावर गेलेल्या राजुरा तालुक्यातील देवाडा येथील एक युवक वाहून गेला. रामकीसन बिजू लोहबळे 19 असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.
    तेलंगणातील आसिफाबाद जवळील तिर्यानी परिसरातील धबधबा प्रसिद्ध आहे. दरवर्षी या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी सीमेलगतच्या महाराष्ट्रातील पर्यटक मोठया संख्येत जातात. आज 21 जुलै रोजी बकरी ईद निमित्य सुट्टी असल्याने देवाडा येथील काही युवक तिर्यानी धबधब्यावर गेले होते. धबधब्यावर आनंद घेत असतानाच उंचावरून पाण्यात उडी घेतल्याने या युवकांपैकी तिघेजण वाहून गेले. सुदैवाने दोघे जण सुखरूप निघालेत. परंतु रामकीसन लोहोबळे हा खोल पाण्यात वाहून गेला. ही बाब देवाडा येथे पोहोचताच युवकांचे नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. आसिफाबाद पोलिस घटनास्थळी पोहोचले आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.