• Advertisement
  • Contact
More

    बल्लारपूर शहरात एका धक्कादायक घटना ट्रकचा धडकेत वृद्धव्यक्ती आश्चर्यकरकपणे बचावल्याची दृश्ये CCTV कँमेरात कैद

    बल्लारपूर शहरात एका धक्कादायक प्रकार घडला आहे ट्रकचा धडकेत वृद्धव्यक्ती आश्चर्यकरकपणे बचावल्याची दृश्ये कलाकेंद्र स्टुडिओ येथील सीसी टीव्ही कँमेरात कैद झाली आहेत. ही दृश्ये बघणाऱ्याच्या अंगावर शहारे आल्यावाचून राहत नाहीत. ही घटना सोमवारी सकळी 11.45 वाजता ची आहे, दादाभाई नोरोजी वॉर्ड येथे स्टुडिओ कलकेंद्र समोरील ही घटना असुन. फुलसिंग नाईक वॉर्डात 70 वर्षीय शंकर मल्लाराम नामक वृद्ध रस्त्यावर बंद ट्रकच्या समोरून जात होता. त्याच क्षणी अचानक ट्रकचालकाने ट्रक सुरू केला. आणी वृद्धव्यक्ती अगदी ट्रकपुढे असल्याने चालकाला दिसला नाही. वृद्धला धडक लागून ट्रकखाली आला. जोरदार धडक बसूल्य मुळे वृद्ध जखमी झाला . त्याच्या अंगावरून ट्रक निघून जात असतांना नागरिक पुढे सरसावले. व त्या जखमी वृद्धाला सडके च्या काठी संजीवनी मेडिकल समोर बसवले
    ,स्टुडिओ कलकेंद्र चे संचालक विनोद राजूरकर, गजानन राजूरकर, जे सी आय क्लब चे अध्यक्ष सुनील जैन व बबलू शेख यांनी एका वाहनातून त्याला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले . सध्या चंद्रपूर येथील जिला सामान्य रुग्णालयात त्यांचा उपचार सुरू आहे, वृद्धाच्या कुटुंबीयांनी ट्रकचालकाविरोधात तक्रार दाखल केली असून पोलीस ट्रक आणि चालकाचा शोध घेत आहेत. या घटनेने ‘देव तारी त्याला कोण मारी’ ची म्हण प्रत्यक्षात आल्याचे मात्र दिसून आले.