• Advertisement
 • Contact
More

  बल्लारपूरातील त्या हत्येचे आरोपी पोलिसांच्या ताब्यात अनैतिक संबंधा तुन पतीची हत्त्या

  बल्लारपूर – शहरातील सास्ती पुलाजवळ 29 जुलैला वेकोली कर्मचारी 44 वर्षीय मारोती शंकर काकडे या इसमाचा मृतदेह मिळाला होता.
  मृतदेहावर धारदार शस्त्राने गळ्यावर वार केल्याच्या खुणा आढळल्या होत्या, बल्लारपूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.
  तपसाअंती प्रकरणाला वेगळे वळण मिळाले मृतकांच्या पत्नीचे दुसऱ्या युवकासोबत अनैतिक संबंध असल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली, पोलिसांनी याबाबत 25 वर्षीय प्राजक्ता काकडे ला ताब्यात घेत विचारपूस केली असता तिने मारोती यांची हत्या केल्याची कबुली दिली.
  प्राजक्ताचे नकोडा, घुघुस येथील 25 वर्षीय संजय मारोती टिकले याच्या सोबत प्रेमाचे सूत जुळले होते, याची कल्पना मृतक मारोतीला झाल्याने मागील 1 वर्षांपासून हत्येचा कट रचला गेला.
  मृतक मारोती याला घुगुस एसीसी सिमेंट कंपनी जवळ असलेल्या नाल्यात त्याला बुडवून, मारोतीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली व नंतर त्याचा मृतदेह सास्ती पुलाजवळ फेकण्यात आला.
  मृतक मारोती नंतर त्याची नोकरी प्राजक्ता ला मिळेल व नंतर संजय व प्राजक्ता लग्न करण्याचा तयारीत होते.
  मात्र बल्लारपूर पोलीसांच्या शिताफीने या हत्येच्या प्रकरणातील आरोपींचा सुगावा लागला.
  आरोपीमध्ये प्राजक्ता काकडे, मृतकाची सासू, प्राजक्ता ची आई 41 वर्षीय कांता देवानंद भसाखेत्रे, रा. पंचशील चौक, चंद्रपूर, संजय मारोती टिकले, वाहनचालक, नकोडा, घुघुस व 23 वर्षीय विकास भास्कर नगराळे रा. नकोडा, घुघुस यांना अटक करण्यात आली आहे.
  सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश पाटील व कर्मचारी यांनी यशस्वीपणे पार पाडली.