भद्रावती शहरात तथा तालुक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून दि.१ रोज बुधवारला श्रीकृष्ण मूर्तीचे शहरातील गवराळा तलावात उत्साहात विसर्जन करण्यात आले.
शहरातील घराघरांतून श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा करण्यात आला.अनेक घरातून श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना करण्यात आली.त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी, गोपालकाला व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी घराघरात खाजगी पातळीवर भजन पूजनाचे कार्यक्रम करण्यात आले.आज दिवसभर शहरातील गवराळा तलावात श्रीकृष्ण मूर्ती आणल्या जात होत्या यावेळी मूर्तीचे रीतसर आरती पूजन करून विसर्जन केले जात होते.
