• Advertisement
  • Contact
More

    भद्रावतीत कोरोना नियमांना तिलांजली ,विनामास्क फिरणा-यांची संख्या वाढली

    भद्रावती : कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरीही कोरोना नियमांचे पाल करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. परंतु, भद्रावतीकरांकडून कोरोना नियमांना तिलांजली देण्यात येत आहे. विनामास्क शहरात फिरणा-यांची संख्या वाढली आहे. दिवसागणिक या संख्येत वाढ होत आहे.
    भद्रावती तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढला आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. मात्र शहरातील बेफिकीरीने वागणारी लोक अनेक ठिकाणी गर्दी करीत आहेत. त्यातच अनेकजण मास्क घालत नसल्याचे दिसून येत आहे. नगरपालिका, तहसील कार्यालय तसेच पोलिस प्रशासनाची कार्यवाही थंडावली असून शहरातील बाजारपेठ, बैंक, सरकारी कार्यालये परिसरात अनेक जण विनामास्क फिरतांना दिसत आहेत. अशा बेशिस्त नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.