• Advertisement
  • Contact
More

    भद्रावतीत गणरायाचे उत्साहात आगमन

    घरगुती गणेशोत्सवात उत्साह, सार्वजनिक उत्सव थंडभद्रावती शहरात गणेशोत्सव उत्साहात सुरू झाला आहे. शहरात गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. घरगुती गणेशोत्सवात जो उत्साह दिसून आला तो सार्वजनिक गणेशोत्सव दिसत नाही. कोरोणा प्रादुर्भावामुळे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव पूर्णपणे कोलमडला असून शहरात फार कमी ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र घरगुती गणेशोत्सवाचा उत्साह पाहण्यासारखा होता. आज सकाळपासून गणरायाच्या स्वागतासाठी शहरात घरोघरी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. बाजारातून सुद्धा गणेशमूर्तीच्या खरेदीसाठी व अन्य पूजासाहित्य, मिठाई खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांनी चांगलीच गर्दी केली. आजपासून पुढील दहा दिवस बाप्पाचा मुक्काम शहरात असणार आहे. त्याचा दहा दिवसांच्या सेवेसाठी गणेशभक्तांनी जोरदार तयारी केली आहे. शहरात गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक रीतीने साजरा करावा असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पालिकेने घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवासाठी स्वतंत्र स्पर्धाही ठेवली आहे. कोरोनाच्या विविध प्रतिबंधांमुळे शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाचा जल्लोष मात्र यावर्षी पाहायला मिळणार नाही. अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडप न घालता परिसरातील मंदिरात गणेशाची स्थापना करण्याचे ठरविले आहे. अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा होत आहे.