• Advertisement
 • Contact
More

  भद्रावतीत महिलांच्या हरितालिका उत्सवाला सुरुवात

  घरोघरी गौरीची स्थापना

  भद्रावतीत महिलांच्या हरितालिका उत्सवाला सुरुवात

  घरोघरी गौरीची स्थापना

  भद्रावती : शहरात महिलांच्या हरितालिका उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. शहरात घराघरांतून गौरीची स्थापना करण्यात आली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या व्रताची सांगता उद्या दिनांक दहा रोज शुक्रवारला श्रीगौरीचे विसर्जन करून करण्यात येणार आहे. हा खास महिलांचा उत्सव असल्याने सकाळपासूनच महिला वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सकाळी महिला वर्गाने गौरीला शहरातील तलावात नेऊन तिथे पूजन व आरती केली. तर काहींनी घरीच गौरीपूजन केले.
  नंतर घरी श्रीगौरीची स्थापना केली. या दिनानिमित्त महिला गौरीचा उपवास करीत असतात. घराघरांतून आकर्षकरित्या सजावटी तथा आरास करून श्रीगौरीची स्थापना करण्यात आली. या निमित्ताने महिलांमध्ये उतसाहाचे वातावरण आहे.