• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    अस्वलाचा इसमावर हल्ला भटाळी परिसरातील घटना

    धम्मशील शेंडे
    चंद्रपूर : इथून जवळच असलेल्या भटाली येथे अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री ७ ते ८ वाजताच्या सुमारास घडली. सुरेश खिरटकर असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
    सुरेश खिरटकर हे शेतात गेले होते. काम आटोपून घरी परत येत असताना झुडुपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. गावालगत झुडुपे आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा गावालगत वावर वाढला आहे. वन विभागाने झुडुपे तोडून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा तसेच जखमी सुरेश खिरटकर यांना मदत करावी अशी मागणी खिरटकर यांच्या मुलाने केली आहे.