• Advertisement
 • Contact
More

  भीमपुर येथे दररोज अवैधरीत्या होते लाखो रूपयाचे लोखंड खरेदी

  कोरची – आशिष अग्रवाल

        कोरची मुख्यालया पासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर दररोज लाखो रूपयाचे लोखंड अवैध रीत्या खरेदी केले जात असल्याचे बघितले जात आहे. कोरची भीमपुर मार्ग हे छत्तीसगड ला जोडले गेले असल्यामुळे या मार्गाने दररोज जड वाहनांची वर्दळ असते. छत्तीसगडच्या रायपुर येथून दररोज कोट्यवधी रूपयाचे लोखंडी सामान जसे सरिया, लोखंडी पाइप, तार, पोल असे लोखंडी साहित्य तेलंगाना व आंध्र प्रदेश येथे विकले जाते. परंतु ट्रक चालक हे मालकांना अंधारात ठेऊन आपल्या गाडीतुन काही लोखंड अवैध रीत्या विकत असल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे मालकाचा नुकसान तर होतच आहे शासनाचा सुद्धा कोट्यवधी रूपयाचा कर बुडविला जात आहे. छत्तीसगड वरुन येणारे ट्रक हे मुख्य रस्त्यावर बिनधास्त पणे थांबत असून खुलेआम ही खरेदी केली जात असल्याचे दिसून येत आहे. दिवसाला खरेदी केलेला माल ग्राहकांना विकला जातो व उर्वरित ट्रक द्वारे देवरी येथे पाठविण्यात येतो.
      अवैधरीत्या ट्रक चालक हे आपल्या गाडीतुन काही लोखंड कमी दरात यांना विकतात ज्यामुळे स्थानीक व्यावसायीकांना सुद्धा याचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर माल हा 40 ते 45 रुपये प्रति किलो या दराने खरेदी करून 60 ते 70 रुपये दराने विकले जात आहे ते पण लाखो रूपयाचे कर बुडऊन. लोखंडी सामानाने भरलेल्या ट्रक चे वजन हे धर्मकाटा येथे केले जाते परंतु 250 ते 300 लीटर डीज़लची क्षमता असणाऱ्या ट्रक मध्ये वजन करतानी सदर ट्रक चालक डीजल भरित नाही व नंतर टैंक फूल करीत असल्यामुळे 200 ते 250 किलो चा वजन आपोआप वाढतो ज्यामुळे तेवढ्या वजनाचे लोखंड हे चालक अवैधरीत्या विकुन टाकतात. ज्यामुळे मालकाला लाखो रूपयाचा चुना लावला जात आहे. याकडे संबधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडिने चौकशी करावी अशी मागणी परिसरातील नागरिकां तर्फे करण्यात येत आहे.