• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महानगर शिवसेनेतर्फे भव्य आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिर संपन्न…

    चंद्रपुर :- शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.श्री.नाम.उध्दव साहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित मुख्यमंत्री साहेबांनी केलेल्या आव्हानाला साद देत चंद्रपुर शिवसेनेतर्फे तुकूम येथे भव्य आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिराचे आयोजन जिल्हा प्रमुख संदिपजी गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर प्रमुख प्रमोदजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी विविध आरोग्य तज्ञ डॉक्टर्स यांच्यावतीने विविध आरोग्य तपासणी करण्यात आले त्यामध्ये ५०० च्या वर लोकांनी सहभाग घेऊन या समाजोपयोगी आरोग्याची काळजी घेणार्या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी विविध आरोग्य चाचण्या सुद्धा करण्यात आल्या व रुग्नांना मोफत औषधे सुद्धा देण्यात आली करण्यात आले. मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डाॅ लोकांनी कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केली त्यामुळे त्यांचे आभार मानत जिल्हा प्रमुखांनी त्यांचे धन्यवाद मानले. कार्यक्रमाला तालुका प्रमुख संतोष नरूले,युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. निलेश बेलखेडे, माजी तालुका प्रमुख शालीफ फाले, माजी महिला आघाडीच्या प्रमुख कुसूम ताई उदार ,वसीमभाई ,राहूल विरूटकर, अशोक चिलखरे, श्रीकांत करडभाजने, स्वप्निल काशीकर,प्रतिभाताई तेलतुमडे,चोबे ताई, विजय ठाकरे,युवासेना चिटनीस विनय धोबे, अनिरूध्द तपासे, अक्षय अंबिरवार, करन वैरागडे , नगाजी गनफाडे, सोनु ठाकूर, नितु बावरे,गनेश रायपायले, राहूल पडघाने, नंदू गेडाम, मुकेश, अराडे, राहूल पडघाने यांची उपस्थिती होती.