• Advertisement
 • Contact
More

  घुग्घुस येथे जुगार अड्डयावर धाड

  घुग्घुस :- शनिवार 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता दीपक महादेव रामटेके रा. वार्ड क्र.2 यांचा घरी 52 ताश पत्त्याचा जुगार सुरु असल्याची माहिती घुग्घुस गुन्हे शोध पथकास मिळाली.
  त्याठिकाणी धाड टाकून आरोपी रिजवान खान माजिद खान, नौशाद इलियास कुरेशी, मोहम्मद सरफराज खान, संदीप बापूराव वासेकर, सुभाष ईश्वर फुलझले, बाबाराव बापू झाडे, अमन संजय आगदारी, थॉमस पल्ली वडके, हिरालाल सहाय कैथल व दीपक महादेव रामटेके सर्व राहणार घुग्घुस यांना कलम 4,5 मजुका गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
  8,480 नगदी रुपये, 5 मोबाईल किंमत 5,100 रुपये, 52 ताशपत्ते किंमत 30 रुपये असा एकूण 13,610 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
  ही कारवाई घुग्घुस गुन्हे शोध पथकाचे उप पोलीस निरीक्षक गौरीशंकर आमटे, सचिन बोरकर, मनोज धकाते, महेंद्र वन्नकवार, रवींद्र वाभीटकर, नितीन मराठे, सचिन डोहे यांनी केली.
  मागील काही दिवसापासून याठिकाणी जुगार खेळ सुरु होता यापूर्वी ही पोलिसांनी येथे धाडी टाकल्या आहे.

  नौशाद शेख घुग्घुस: प्रतिनिधि सर्च टि, व्ही,