• Advertisement
  • Contact
More

    बोंडाळा बुज.येथील इसमाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

    तालुक्यातील बेंबाळ पोलीस चौकी च्या हदीतील बोंडाळा बुज.येथील इसमाने गावातीलच विहीरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. किरण वाकुडकर वय 45 असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. मृतकाची पत्नी ही काही दिवसापूर्वीच दवाखान्यात भरती हेाती. या कालखंडात किरण ही एकटाच घरी राहत होता.
    आज दिनांक 24 जूर्ले 2021 रोजी दुपारच्या सुमारास सुमारास गावातीलच देशमुख किराणा दुकानासमोरील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
    त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. घटनेची माहिती पोलीसांना होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वृत्त लिहीपर्यंत पंचनामा सुरू होता. मृतकाच्या मागे पत्नी व दोन मुली वडील असा आप्त परिवार आहे