• Advertisement
 • Contact
More

  इंधन दरवाढ विरोधात ब्रम्हपुरी शहरातील पेट्रोल पंप समोर काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी अभियान

  ब्रम्हपुरी:-
  देशभरात पेट्रोल व डिझेलसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करित आहे. काँग्रेसच्या वतीने आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आले. तरीही झोपलेल्या केंद्र सरकारला जाग आली नाही. दिवसेंदिवस अधिकच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध करण्यासोबतच पेट्रोल डीझेलची दरवाढ मागे घेण्यात यावी याकरिता काँग्रेसच्या कमिटीच्या वतीने दि. ११ जूलै रविवारी ब्रम्हपुरी शहरातील पेट्रोल पंपा समोर स्वाक्षरी अभियान राबवून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

  मागील काही महिन्यांपासून देशात सातत्याने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर आदी जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहे. इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोल व डिझेलचे दर शतक पार केले आहे. याचा परिणाम इतर व्यवसायावर झाला. त्यामुळे अनेक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत, यातच महागाई वाढली असल्याने सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे.
  या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरूद्ध घोषणाबाजी करत त्वरित दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
  यावेळी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमेटिचे अध्यक्ष खेमराज तिडके, काँग्रेस कमेटिचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, जि.प.सदस्य स्मिताताई पारधी, नगरसेविका सौ.सुनीताताई तिडके, नगरसेविका सौ. सरीताताई पारधी, नगरसेविका सौ. लताताई ठाकुर, नगरसेविका सौ. वनिताताई अलगदेवे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंगलताई लोनबले, शहर काँग्रेसच्या अध्यक्षा योगीताताई आमले, पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, शहर काँग्रेस कमेटिचे अध्यक्ष तथा नगरसेवक हितेंद्र राऊत, सुधा राऊत, गीता मेश्राम, किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष नानाजी तुपट, चिमुर विधानसभा ब्रम्हपुरी तालुका विभाग अध्यक्ष काशिनाथ खरकाटे, जगदीश तलमले, सुधीर पंदीलवार, माजी सभापती कृ.उ.बा.स. मोरेश्वर पत्रे, राजेश तलमले, वामन मिसार, दिवाकर मातेरे, नरेश सहारे, गुड्डु बगमारे,भास्कर सोनोने, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश बानबले,हेमंत सेलोकर, माजी नगरसेवक जगदीश आमले, नगरपरीषदेचे माजी उपाध्यक्ष नारायण मेश्राम, नंदकिशोर गुड्डेवार, सोमाजी उपासे, किशोर राऊत, यशवंत राऊत, गुरूदेव वाघरे, प्रमोद सातपुते, सुर्यभान धोटे, अमोल सलामे, नंदु भानारकर, सुरेश वंजारी यांसह अन्य काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.