• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  बैलाच्या शिंगाने वृद्ध महिलेचा मृत्यू

  चंद्रपूर : बल्लारपूर येथून एक वेदनादायक घटना उघडकीस आली असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे .

  मौलाना आझाद वॉर्ड निवासी सरस्वती दुलारे कैथल वय ( ७४ ) महिला २१ जुलै रोजी दुकानात समान घेण्यासाठी घराबाहेर आली होती. रस्त्यावर उभे असलेल्या बैलाने त्या महिलेला
  धडक दिली त्यात बैलाचे शिंग महिलेच्या पाठीवर लागल्याने महिला गंभीर जखमी झाली तिला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान तीचा मृत्यू झाला.

  महिलेच्या कुटुंबीयांनी सदर बैलाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.