• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  वाघाने केले बैलाला ठार सावली तालुक्यातील घटना

  रयतवारी येथील घटना… सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत व्याहाड खुर्द ऊपरी वनपरिक्षेत्रातील
  चंद्रपुर :- रयतवारी गावातील बाळकृष्ण भांडेकर हे आपल्या शेतात घाम पिकाची रोहणी करीत असताना नांगराला जुंपलेल्या बैलांना विश्रांती घेण्याकरिता तीनच्या सुमारास बैलांना गवत टाकून झाडाला बांधून ठेवले व परे खोदण्याचे काम सदर शेतकरी करीत होते कामात मग्न असतांना जंगल परिसराला शेत शिवार लागून असल्यामुळे जंगल परिसरात भटकणाऱ्या वाघ आणि अचानक झाडाला बांधून ठेवून गवत खात असलेल्या बैलांवर वाघाने हमला केला. बैलाचा ओरडा ओरडा पाहून शेतात काम करणारे शेतकरी वाघाच्या तोंडात असलेल्या बैलाला वाचवण्यासाठी धावपळ करून ओरड केली मात्र वाघ आणि बैलाच्या गळ्याला पकडल्यामुळे बैल जागीच ठार झाले. बैलाला पकडलेल्या अवस्थेत सर्व शेतकरी वाघ आला बघून भयभीत झाले त्यानंतर शेतकऱ्यांच्या ओरडण्याने वाघाने बैलाला सोडून जंगलामध्ये पसार झाले ही घटना आज तीन वाजता च्या सुमारास घडलेली आहे शेतकऱ्याचे धान पीक रोहिणीचे हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांची मोठी नुस्कान झालेली आहे त्यामुळे नुसकान भरपाई देण्यात यावी व वाघाचा बंदोबस्त करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे
  सदर घटना वन विभागाला कळविले असता घटनास्थळी वनविभाग उद्याला येणार असे बोललेले आहे
  मात्र सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्र अंतर्गत हप्त्याभरात वाघ आणि बिबट्या च्या अनेक घटना झालेली असून या घटनांमध्ये अनेक प्राण्यांसह मानवी जीव गमावावे ला ग ल्यामुळे सावली तालुक्यात सध्या बिबट्या वाघाचे चांगलीच दहशत निर्माण झाले असून वाघ व बिबट्याला जेरबंद करण्याकरिता वन विभाग अजूनही अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे.

  (संग्रहित चित्र)