• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थि यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे

  चंद्रपूर दि.15 जुलै : सत्र 2020-21 मध्ये 12 वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेशित असलेले आणि चालू सत्रात एमएचटी-सीईटी, नीट, जेईई, एमबीए, बीएड ईत्यादी प्रकारच्या सीईटी देऊन व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी आपला ऑनलाईन पध्दतीने सादर केलेला जात प्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव तात्काळ प्रत्यक्षात अथवा पोस्टाद्वारे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी, कार्यालयास सादर करावा.
  ऑनलाईन सादर केलेल्या प्रस्तावाची छायांकित प्रत, सीईटी प्रत, मुळ शपथपत्रे फॉर्म न.3 व 17 आणि आवश्यक दस्तऐवजांच्या छायांकित प्रती कार्यालयात सादर करुन ऑनलाईन भरणा केलेल्या पावतींची पोहोच घ्यावी.
  आनलाईन प्रणालीमध्ये अर्जदाराचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला (वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास इतर नावाचा पुरावा) आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला (आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास इतर नावाचा पुरावा) तसेच जातीदावा सिध्द करणारे जातीचे व अधिवासाचे मानीव दिनांकापुर्वीचे (अनुसूचित जाती करीता सन 1950 पुर्वीचे, विमुक्ती जाती व भटक्या जमाती करीता 21 नोव्हेबर 1961 पुर्वीचे व इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्गाचे उमेदवारांनी 13 आक्टोंबर 1967 पुर्वीचे) महसुली पुरावे सादर पुरावे. (महसुली पुरावे-सात-बारा, अधिकार अभिलेख, पी-1, पी-2, कर आकारणी यादी इ.) याप्रमाणे दस्तऐवज ऑनलाईन प्रणालीमध्ये पडताळणीकरीता आवश्यक आहेत.
  तरी दिलेले आवश्यक दस्तऐवज सादर करुन जात प्रमाणपत्र पडताळणी तात्काळ करुन घ्यावी. जेणेकरुन सत्र 2021-22 मध्ये जात वैधता प्रमाणपत्राअभावी कोणताही मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेशापासुन वंचित राहणार नाही, असे चंद्रपूर, जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त श्री. विजय वाकुलकर यांनी कळविले आहे.