• Advertisement
  • Contact
More

    विरुद्ध दिशेने येणाऱ्या चड्डा ट्रान्सपोर्ट कम्पणीच्या ट्रक ने दिली दुचाकीला जोरदार धडक, घुग्घुस मार्गावरील घटना

    विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक ने दुचाकीला जबर धडक दिल्याची घटना घुग्घु HBस मार्गावर सोयाबिन अंर्तूला फाट्याजवळ घटना,घडली असून या धडकेत दुचाकीस्वार करण कोटावार हा गंभीर जखमी झाला.त्याच्यावर पोद्दार रुग्णालयात उपचार सुरु आहे. करण हा सकाळी चंद्रपूर जाण्यासाठी आपल्या दुचाकी वाहन क्रमांक Mh 34 An 1544 ने निघाला होता, काही अंतरावर गेल्यावर चड्डा ट्रान्सपोर्ट कम्पणीच्या वाहन क्रमांक Mh31 CQ 3181 ने विरुद्ध दिशेने जात करण च्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत जखमी झालेल्या करण ला नागरिकांनी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले, मात्र धडक दिल्यावर ट्रक चालक तिथून फरार झाला, घुग्घुस पोलिसांनी ट्रक व दुचाकी पोलीस स्टेशनला आणले असून पुढील तपास सुरु आहे.

    नौशाद शेख घुग्घुस: प्रतिनिधि सर्च टि, व्ही,