महाराष्ट्र व्यसनमुक्ती समन्वय मंचाने घेतली राज्यपालांची भेट
ब्रह्मपुरी :- राज्यात सत्तेत आलेल्या महा विकास आघाडी ने चंद्रपूर जिल्हा दारूबंदी असताना दारू बंदी उठवली दारूचे दुकान खुली केली आहेत मात्र कित्येक संघटनेकडून याला विरोध होत गेला आणि भाजप सरकारने जिल्हाबंदी केली मात्र पुन्हा नव्याने चालू झालेली दारूचे दुकाने पूर्णता बंद करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती समन्वय समिती व भूवैकुंठ टेकडी सेवा मंडळाच्या वतीने महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेत चंद्रपूर जिल्ह्यात चालू झालेली दारू पुन्हा बंदी उठविण्याची मागणी 2011 व्यसनमुक्ती धोरण अंतर्गत अंमलबजावणी करावी यासाठी राज्यपालांकडे भेट घेतल्याचे समजते.
यावेळी महामहिम राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात राज्य निमंत्रक अविनाश पाटील राज्य निमंत्रक वर्षा ताई विद्या विलास सामाजिक कार्यकर्ता वसुंधरा सरदार रंजना गवादे श्री सुबोध दादा संचालक तथा मार्गदर्शक आत्मअनुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडी ब्रह्मपुरी यांची उपस्थिती होती.
