• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  चंद्रपुर – तेलंगाणा मार्ग बंद होण्याच्या मार्गावर राजूरा परिसर जलमय

  धम्मशीलशेंडे, चंद्रपुर

  चंद्रपूर वरुन हैद्राबादकडे जाणारा मार्ग बंद झालाय. या आंतरराज्यीय मार्गावर लक्कडकोट जवळ नाल्याला पूर आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. लक्कडकोट जवळ रात्रभर वाहतूक बंद ठेवण्यात आली वाहनांच्या रांगाच-रांगा या मार्गावर लागल्या होत्या, प्रवासी रात्रभर येथे अडकले होते.
  बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने राजुरा शहर जलमय झाले आहे. मार्गावर पाणी आल्याने राजुरा ते गडचांदूर मार्ग बंद झाला आहे, तर रामपूर-गोवरी मार्गावरही पाणी आल्याने हा मार्ग सुद्धा ठप्प झाला आहे.
  सतत पडणाऱ्या पावसाची स्थिति पाहता राजूरा येथील वर्धा नदिचा पूल सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे, अवघ्या 3 फुटाचे अंतर बाकी आहे, असे प्रत्यक्षदर्शी माहिती देत आहेत.

  पोलीस व महसूल प्रशासन या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून राजुरा शहरातील आमराई वार्ड, साईनगर, रामपूर आदी भागात पाणी साचले आहे.
  गडचांदूर मार्गावरील भवानी माता मंदिरजवळील नाल्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक खोळंबली आहे.