• Advertisement
 • Contact
More

  चंद्रपूर जिल्ह्यातून पहिल्यांदाच तीन विद्यार्थी UPSC परीक्षेत उत्तीर्ण

  युपीएससी सिव्हील सेवा परीक्षेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून एकाचवेळी तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले
  आहेत.या निकालावरुन आदिवासी समजल्या जाणारा चंद्रपूर जिल्हाही युपीएससीमध्ये मागे नाही यावरून सिद्ध झाले आहे. चंद्रपूर येथील अंशूमन यादव (रँक 242), वरोरा येथील आदित्य जीवने (393 रँक) व सावली येथील देवव्रत मेश्राम (713 रँक) असे या गुणवंत विद्यार्थ्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे हे तीनही विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील आहे.सर्वात कठीण परीक्षा म्हणून
  युपीएससी परीक्षेकडे बघितल्या जाते. नियुक्तीसाठी पात्र ठरलेल्या एकूण 771 उमेदवारांमध्ये चंद्रपूर
  येथील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सावली येथील देवव्रत मेश्राम याने चवथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा सावली येथून घेतले.त्यानंतर त्याची नवोदयला तळोधी बाळापूर येथे निवड झाली.आयआयटी खडकपूर येथून त्याने इलेक्ट्रानिक इंजिनअरिगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर
  युपीएससीची परीक्षा दिली.पहिल्याच प्रयत्नात त्याने 713 वी रँक प्राप्त करुन परीक्षा उत्तीर्ण केली.तर आदित्य जीवने यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण वरोरा येथूनच घेतले.नागपूर येथे उच्च माध्यमिक
  शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंजिनिअरिगची पदवी घेऊन युपीएससीची तयारी केली होती.आदित्यने 393 वी रँक पटकावून ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. चंद्रपूर जटपुर गेट येथील अंशमून यादव हे
  पूर्वीपासून उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी २४२ वी रँक पटकावून युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केल्याने जिल्ह्याच्या
  लौकिकात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे.