• Advertisement
 • Contact
More

  चंद्रपुरातील धानोरा- जुगाद परिसरात वाघाची दहशत, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

  चंद्रपुरातील धानोरा-इराई-भारोसा जुगाद परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील इरई भारोसा येथील तामसी घाट इथे शेतकऱ्यांना वाघाचे निशाणे दिसल्याने खडबळ उडाली आहे.

  त्यामुळं शेतकऱ्यांना शेतात जायला भीती वाटत असून काम करायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. वाघांचे दर्शन तसेच हल्ले दिवसेंदिवस वाढतच असून आज जुगाद गाव परिसरात वाघाचे दर्शन झाले. तसेच वाघाचे पगमार्क दिसून आले. त्यामुळं शेतकरी भयभीत झाले असून वाघांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

  यावेळी वनविभागाने वाघावर पाळत ठेवण्यासाठी चार कॅमेरे लावले असून वनवीभागाने अधिकारी पाथरडे, गोंडने,पठाण,चौधरी,मंगेश, सुनील,उपरे,सुरेश यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला

  नौशाद शेख, घुग्घुस-प्रतिनिधी, सर्च टि, व्ही,