• Advertisement
  • Contact
More

    चंद्रपूर जिल्ह्यात मातेच्या धाडसाने वाचविले लहानग्या मुलीचे प्राण

    चंद्रपूर जिल्ह्यात मातेच्या धाडसाने लहानग्या मुलीचे प्राण वाचले. चंद्रपूर शहरालगत जुनोना गावाजवळ आई अर्चना मेश्राम मुलीसह गावातील नाल्याजवळ बकऱ्यासाठी चारा आणण्यासाठी गेली होती. चारा तोडत असताना थोड्या दूरवर चिमुकली प्राजक्ता उभी होती. एवढ्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राजक्तावर झडप घातली आणि थेट मुंडके जबड्यात घेतले. हा प्रकार पाहून भेदरून न जाता.  जवळ असलेल्या काठीने आई अर्चनाने बिबट्यावर प्रहार केले. दणक्यामुळे बिबट्याने चिमुकलीला सोडून आईवर हल्ला केला. हा हल्ला काठीच्या सहाय्याने परतवून लावला मात्र बिबट्या दुसऱ्या वेळेस चिमुकलीकडे वळून फरफटत नेऊ लागला. आता मात्र प्राजक्ताची आई ‘दुर्गा’ झाली होती. तीने पुन्हा बिबट्यावर प्रहार केल्यावर मात्र, यावेळेस घाबरून बिबट्या पसार झाला. घटनेनंतर जखमी अवस्थेतील बेशुद्ध प्राजक्ताला घेऊन आईने तातडीने रुग्णालय गाठले. चंद्रपुरात उपचार झाल्यावर  सध्या प्राजक्ता नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात चेहऱ्याच्या पक्षाघातावर उपचार घेत आहे. मातेच्या निग्रही प्रतिकारापुढे बिबट्यालाही पळ काढावा लागला. डॉक्टर्स ती स्वस्थ व्हावी यासाठी आपल्या पद्दतीने  प्रयत्न करत आहेत.