• Advertisement
 • Contact
More

  चारचाकी दिली नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या युवकाने डोक्यावर ताणली बंदूक, घुग्गुस येथील घटना,पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सोडले

  चारचाकी दिली नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या युवकाने डोक्यावर बंदूक ताणून अश्लील शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना काल बुधवारी रात्री घुग्गुस शहरातील गांधीनगर येथे घडली आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेची तक्रार सौरव गणगोणी व लक्ष्मी गणगोणी यांनी घुग्गुस पोलिसात दिली असून रात्री उशिरा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. सोनल राबट असे आरोपीचे नाव आहे. मात्र पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सोडून दिल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

  काही दिवसांपूर्वी आरोपी सोनल राबट याने शेजारी राहणाऱ्या सौरव गणगोनि याला काही कामासाठी चारचाकी वाहन मागितले होते.मात्र सौरव याने आरोपी सोनल याला चारचाकी देण्यास मनाई केली. याचाच राग मनात धरून आरोपी सोनल ने काल बुधवारी रात्री भांडण करून अश्लील शिवीगाळ करत सौरव याला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर काही वेळातच आरोपी सोनल याने स्वतः जवळ असलेली सिल्वर कलरची बंदूक काढून सौरव च्या डोक्यावर ताणली. त्यानंतर बंदुकीच्या खटक्याचा आवाज ऐकताच सौरव ची आई लक्ष्मी गणगोनि ही बाहेर आली. त्यानंतर आरोपीने त्यांना सुद्धा शिवीगाळ केली. हा संपूर्ण घटनाक्रम बघता घुग्गुस पोलिसांना माहिती देण्यात आली . पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. मात्र पोलिसांनी आरोपी सोनल राबट वर कलम 323,504,506 दाखल करून त्याला सोडून दिले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

  सोनल राबट हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला युवक असून दारूपिऊन शिवीगाळ करणे,गुंडगिरी करणे, धमकवणे असे त्याचे कृत्य असून पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी गणगोणी परिवाराने केली आहे.

  नौशाद शेख घुग्घुस प्रतिनिधि सर्च टि, व्ही,