• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    महानगर पालिकेचा प्रताप आरोग्य सुविधे ऐवजी वाहनाच्या व्हिआयपी क्रमांकावर पैसे खर्च

    कारवाई करण्याची संजीवनी सामाजिक संस्थेची मागणी

    चंद्रपूर :- एकीकडे कोरोनाचे संकट हाताळण्यासाठी निधी नसल्याची ओरड करणाऱ्या मनपाने दुसरीकडे निधीची उधळपट्टी केली. महानगरपालिका आयुक्तांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लाट उच्चांकावर असताना निधीअभावी व्हेंटीलेटर, ऑक्सीजनची खरेदी न केल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला असताना त्याचकाळात मनपा आयुक्ताने महापौरासाठी नविन घेतलेल्या वाहनाला व्हिआयपी क्रमांकासाठी ७० हजार रुपये खरेदी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या संजीवनी सामाजिक व पर्यावरण संस्थेने आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्याकडे केली आहे. मनपा महापौर वापरत असलेल्या मनपाच्या वाहनाचा क्रमांक व्हिआयपी आहे. याची चौकशी केली असता मनपाने राज्य परिवहन विभागाकडे तब्बल ७० हजार रुपये भरुन सदर क्रमांक प्राप्त केला. मात्र ज्या काळात या क्रमांकावर मनपाने पैसे खर्च केले त्या काळात शहरात कोरोना लाट मोठ्या प्रमाणात पसरली होती. यावेळी रुग्णांना ऑक्सीजन, व्हेंटिलेटरची आवश्यकता होती मात्र मनपाने पैसे नसल्याचे कारण दाखवून त्यावेळी दुर्लक्ष केले आता मात्र दोन महिन्यानंतर व्हिआयपी क्रमांकासाठी पैसे खर्च केल्याने मनपाची प्रतिष्ठा जनमानसात धुळीस मिळाली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांच्या मार्फत मुख्यमंत्री, नगरविकास मंत्र्यांना तक्रार करुन कारवाईची मागणी राजेश बेले यांनी केली आहे.