• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    “स्तनपानाचे संरक्षण हे एक सामायिक जबाबदारी” जिल्हा रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताह उद्घाटन सोहळा साजरा

    चंद्रपुर :- आज दिनांक २ जुलै ला जिल्हा रुग्णालय चंद्रपुर येथे जागतिक स्तनपान सप्ताह उद्घाटन सोहळा साजरा करण्यात आला.
    मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठौड यांच्या अध्यक्षतेखाली स्तनपान सप्ताह हा कार्यक्रम संपन्न झाला प्रमुख पाहुणे अति. जि.श.चि. डॉ हजारे मॅडम बालरोग तज्ञ, डॉ. कन्नाके बा.नि.वै. अधिकारी, डॉ दिप्ती श्रीरामे स्त्रीरोग तज्ञ, तसेच चंद्रपुर सी.ओ.जी.एस.चे अध्यक्षा मा.डॉ कविता गांधी, मा.डॉ चिद्दरवार स्त्रीरोगतज्ञ, जॉईन्ड सेक्रेटरी मा.डॉ बंदना रेगुंडवार, चेअरपरसन वुमन विंग आय. एम. ए.मा.डॉ मनिषा घाटे, सेक्रेटरी मा. डॉ. नगिना नायडु, मा.डॉ जया भलमे स्त्रीरोगतज्ञ, मा. श्रीमती माया आत्राम अधिसेविका जि.रु. चंद्रपुर सन्माननिय उपस्थित पाहुणे कार्यक्रमाला लाभले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती आशा बावणे सा.आ.प. यांनी सूत्रसंचालन केले. व आभारप्रदर्शन श्रीमती गीता मेश्राम सा. आ. प. यांनी केले. रुग्णालयातील नर्सिग टयुटर श्रीमती रायपुरे, श्रीमती कन्नाके, रागिनी अंबलबार मनिशा फाले आ सेविका तसेच आहारतज्ञ सुजाता जोंधळे तसेच नर्सिग प्रशिक्षणार्थिव लाभार्थि उपस्थित होते..

    मान्यवरांनी स्तनपानामुळे रोगप्रतिकारशक्ती मुलांमध्ये कशी तयार होते बाळाच्या बौदिधक व शारीरीक वाढीकरिता स्तनपानाचे महत्व सांगीतले. जि.श चिकित्सक यांनी कोरोनाकाळामध्ये बाळामध्ये स्तनपानाचे फार महत्व आहे, जि.रु. मध्ये हिरकणी कक्ष आहे त्याचा स्तनपान करणा-या मातांनी उपयोग करून घ्यावा मिल्क बँक होणे आवश्यक आहे अशी भावना आपल्या भाषणातुन व्यक्त केली. महीलांमध्ये स्तनपानाविषयी जागृती निर्माण करणे हे जागतिक स्तनपान सप्ताहाचे मुख्य ध्येय आहे. जि.रु. चंद्रपुर येथे दिनांक १ जुलै ते ८ जुलै असे सात दिवस कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमामधुन जनजागृती प्रदर्शनी, आरोग्य शिक्षण लाभार्थिंना देण्यात येणार आहे. प्रसुतीकक्ष, प्रसुतीपश्चात कक्ष, सिझेरियन वार्ड, बालरोगकक्ष एन. आर. सी. ए. एन.सी. क्लीनीक लसीकरण क्लीनिक इत्यादी ठिकाणी वरील कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.