• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  तळीरामांनो जरा जपून देशी दारुच्या बंद बॉटल मध्ये काक्रोज

  दारू विक्रेत्यांचा तळीरामाच्या जिवांशी खेळ

  चंन्द्रपुर :- जिल्ह्यातील दारु सुरु होताच अवैध दारु विक्रेत्यांनी ग्रामीण भागात आपले बस्तान साधत अवैध दारु पुरवठा करत असुन गल्लीबोळात अवैध दारू विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आता तर बनावट दारुचा सर्रास पुरवठा करुन विक्री केली जात आहे.
  ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भो), अ-हेरनवरगाव असे तालुक्यातील प्रत्येक गावात दहा बारा दारु विक्रेते तयार करुन दारु विकली जात आहे.

  पिंपळगाव भो येथील एका तळीरामाने पिंपळगाव येथील एका अवैध दारु विक्रेत्याकडुन दुपारी २ वाजता सुमारास हराळे चौकातील टपरीवर सीलबंद देशी दारुचा टिल्लू पिण्यासाठी आणला व टिल्लु फोडुन पिण्यासाठी काढला तर शिलबंद देशी टिल्लु मध्ये काक्रोज दिसताच तो टिल्लू अवैध देशी दारु विक्रेत्याकडे परत नेले मात्र त्या अवैध देशी दारु विक्रेत्यांनी तो टिल्लु परत घेवुन त्या बदल्यात दोन टिल्लु दिले पण कोणाला सांगु नको,व दाखवुन फोटोही काढु देवु नये म्हणुन एका काक्रोज असलेल्या टिल्लु ऐवजी त्या बदल्यात दोन टिल्लु ची घुस दिले असल्याचे प्रत्येक्षदर्शी वास्तव चित्र पाहावयास मिळाल्याची वार्ता आहे.