• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    खा बाळूभाऊ धानोरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त प्रशांत भारती यांच्या तर्फे रेनकोट चे वाटप

    चंद्रपुर :- मा.खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंटकं युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात येणाऱ्या सेवा सप्ताहाचा आज दिनांक १०/७/२०२१ रोजी समारोपीय कार्यक्रम मेजर गेट इथे मा.इंटकं जिल्हाध्यक्ष श्री प्रशांतजी भारती यांच्या हस्ते कामगारांना रेनकोट वाटून साजरा करण्यात आला यावेळी कामगारांना संबोधित करतांना गेल्या सात दिवसा पासून सुरू असलेल्या सेवा सप्ताहात करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली तर वृत्तवाहिनीशी बोलतांना येणाऱ्या काळात केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेलच्या भाववाढ व वाढत्या महागाई विरोधात आंदोलन करून लवकरच जनआंदोलन उभे करू केंद्रातील अकार्यक्षम सरकार तुमच्या सहकार्याने हाकलून लावू अशी हुंकार भरली यावेळी कार्यक्रमाला इंटकं ट्रान्सपोर्ट युनियनचे जिल्हाध्यक्ष श्री इरफान भाई,आमिर भाई शेख,मनोजजी खांडेकर,कुलदीप सिंग बावरे, अश्रफ खान,आलोकजी चवरे, सुनील पोवार,साहिल शेख,पवन मडावी,सौरव घोरपडे व प्रणय दडमल सहित असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.