• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    लसिकरण जनजागृती मोहिम कार्यक्रम संपन्न

    चंद्रपुर :- जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान चा माध्यमातून ज्येष्ठ नागरिक सेवा व सुश्रुषा कार्यक्रम राबविले जात आहे या कार्यक्रमा अंतर्गत दिनांक 12 जुलै 2021 रोजी चंद्रपूर तालुक्यातील सहा गावात कोरोना मुळे अडचणीत आल्या अश्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, मास्क व सॅनिटाझरचे वाटप करण्यात आले. सर्व प्रथम मारडा या गावात ग्राम पंचायतचा सहकार्याने गावातील ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, मास्क व सॅनिटाझरचे वाटप करण्यात आले. ..या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मा. आशुतोष सपकाळ साहेब (संवर्ग विकास अधिकारी, उ.श्रे.), मा. गणपत चौधरी (सरपंच) मा. नितिन नार्लावार (संस्थापक, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान) डॉ. खुशबू चंदेल(जिल्हा समन्वयक) मा. बाळाजी काळे (उपसरपंच), ग्राम पंचायत सदस्य मा. निकिता वाकुलकर, मा. शुभम गोरे, मा. रेखाताई अडबायले, ग्राम सेवक मा. पिदूरकर, अरुणा खिरटकर (डेटा मॅनेजर) यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची प्रास्थाविकता चंद्रपूर तालुका समन्वयक मनोज सोदारी यांनी करतांना ज्येष्ठ नागरिक प्रकल्पाचा कार्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून प्रकल्पाचा माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा, गाव पातळीवर सुरू करण्यात आलेल्या मायेची सावली उपक्रम बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कोव्हीड 19 लसीकरण बाबत असलेले अफवा व गैरसमज दूर करून लसीकरण घेण्याकरिता सर्वाना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. आशुतोष सपकाळ सर यांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. गावातील नागरिकांचे लसीकरण 100 टक्के झाले पाहिजे या उद्देशाने लसीकरण घेण्याकरिता मार्गदर्शन केले. तसेच जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान संस्थेच्या कार्याबद्दल कौतुक करून असे उपक्रम राबविण्याकरिता आमचा पूर्ण सहकार्य राहणार असे मत व्यक्त केले.
    त्यानंतर पिपरी, वढा,ताडाळी, मोरवा व भटाळी या गावातील कोरोना मुळे अडचणीत आल्या अश्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, मास्क व सॅनिटाझरचे वाटप करण्यात आले.. या कार्यक्रमात गावातील सरपंच, उपसरपंच, ग्राम सेवक, ग्राम पंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक सेवा व सुश्रुषा कार्यक्रम प्रकल्पातील पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..एकूण सहा गावात 250 रेशन किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिकांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला.. तसेच गावातील स्वयं सेवक, तरुण मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य मिळाले..