• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    सामान्य रुग्णालयातील 50 कोविड कामगारांना केले तडकाफडकी कार्यमुक्त

    धम्मशील शेंडे, चंद्रपुर

    चंद्रपुर :- क्रिस्टल इन्टीग्रेट सर्व्हस प्रा. लि. या कंपनीचे काम सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे कोविड कामाकरीता पन्नास (५०) मुला – मुलींची भरती करण्यात आली होती. या कंपनीचे १२ एप्रिल २०२१ ला कामाची सुरुवात झाली. या कोरोना कालावधीत पन्नास (५०) मुल – मुलींनी स्वतःचा जिव धोक्यात घालून कोरोना रुग्णाच्या सेवेत तीन महीने अविरत कार्य केले. परंतु कूठलीही पूर्व सुचना न देता कामावरुन काढण्यात आले. हे 50 कामगार कोविड रुग्णालयात रुगनांना सेवा पुरविन्याचे काम करीत होते.

    सामान्य रुग्णालयात कुठल्याही प्रकारची बाह्य भरती न करता कर्मचाऱ्यांना पुर्ववत कामावर घेण्यात यावे सर्व कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा, समोर सर्व कर्मचाऱ्यांना दोन ते तिन महीने काम करण्याचा कालावधी देण्यात यावा अशी मागणी कामगारां नी निवेदनातून मागणी केली आहे.