• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    कोविड काळात रुग्णांची आर्थिक लूट करणारे डॉ. मंगेश गुलवाडे यांनी राजीनामा द्यावा – नंदू नागरकर

    चंद्रपुर :- कोविड महामारी दरम्यान खासगी कोविड रुग्णालयांन कडून करण्यात आलेल्या पिळवणुकीत भाजपा चे चंद्रपूर जिल्हा शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांची भूमिका रुग्णांचे छळ करणारे आहे असे महानगरपालिकेच्या लेखापरीक्षणातून उघड झाले, ४० बेड ची परवानगी घेऊन ८० बेडेड रुग्णालय यांनी सुरु केले. चंद्रपूर मनपाच्या मुख्य लेख अधिकारी मनोज गोस्वामी यांच्या कडून वारंवार रुग्णान कडून अतिरिक्त दर आकारणाऱ्या डॉ मंगेश गुलवाडे व ईतर रुग्णालयांना पत्र पाठवण्यात आले असूनहि यांच्या या पिळवणुकीत कोणत्याही प्रकारचे फरक पडले नाही व यांनी रुग्णाची मोठ्या प्रमाणात पिळवणूक सुरु ठेवली. आता प्रशासनाने डॉ मंगेश गुलवाडे यांच्या वर तब्बल ९४ लक्ष अतिरिक्त वसुली केलेली सांगून याना हि देयक रुग्णांनाच्या परिवाराला शिबीर घेऊन वापस करण्याचे आदेश दिले आहे.

    डॉ मंगेश गुलवाडे हे फक्त भाजप चंद्रपूर जिल्हा शहर अध्यक्ष नसून IMA (इंडियन मेडिकल असोसिएशन) चे अध्यक्ष सुद्धा आहे तसेच मेडिकल कॉलेज चंद्रपूर येथे कंत्राट पद्धतीत प्रोफेसर सुद्धा आहे समाजात अश्या महत्वपूर्ण भूमिका मांडणाऱ्या व्यक्ती ने जानुन बुजुन आसा प्रकार केला आहे तरी नैतिक जबाबदारी स्वीकारून सर्वपदाचा राजीनामा द्यावा तसेच प्रशासनाने यांच्या वर गुन्हेदाखल करून योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा काँग्रेस पक्ष तर्फे भाजपा व प्रशासन विरुद्ध नागरिकांचे हित जोपासण्या करीता रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन नंदु नागरकर माजी अध्यक्ष शहर जिल्हा कॉंग्रेस कमेटी तथा नगरसेवक मनपा चंद्रपुर, सुनीता लोढ़िया सदस्य अ.भा.कॉ. क. तथा नगरसेविका मनपा चंद्रपुर, अश्विनी खोब्रागडे उपाध्यक्ष मा. प्रदेश काँग्रेस कमेटी अनुसूचित विभाग, अनु देहगावकर जिल्हाध्यक्ष चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमेटी अनुसूचित विभाग, शलिनी भगत शहर अध्यक्ष चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमेटी अनुसूचित विभाग यानि मा. आयुक्त मनपा चंद्रपुर याना दिले.