• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  पोलीस शिपायावरच बलात्काराचा गुन्हा आरोपी सह महिलेला अटक

  चंद्रपुर :- पीड़ित महिलेने काल दिनांक 30 जुलै ला रामनगर पोलिस स्टेशन येथे एका पोलीस शिपाया विरुद्ध अत्याचाराची तक्रार दाखल केली त्याअनुषंगाने रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून रात्रो आरोपी शिपाई राजेश मोगरे व वंदना गवळी या दोघांना अटक केली.
  सविस्तर वृत असे की पिडित महिलेचे पतीसोबत वैवाहिक वाद झाल्याने ती मागील अनेक वर्षापासून आई वडिलांकडे वरोरा येथे राहत होती व चंद्रपूर येथे काम सुरू असल्याने ती चंद्रपूर येथे सुद्धा राहायची.
  दरम्यान काही दिवसापूर्वी पोलीस कर्मचारी राजेश मोगरे यांची वंदना गवळी या महिलेच्या माध्यमातून ओळखी झाली. तेव्हापासून त्यानी मागील दोन महिन्यात पीडितेवर जोरजबरदस्ती चालवली व तुझ्या नवऱ्याला माझ्यासोबत संबंध असल्याचे सांगतो नाहीतर मी म्हणतो ते कर असे नेहमी धमकावीत होता. असे फसवून पीडित महिलेवर बलात्कार करीत होता.

  दिनांक ३० जून ला पीडित महिलेला वंदना गवळी हिचा अपघात झाल्याचे खोटे सांगून वरोरा नाका चौकात बोलावले दरम्यान तूकूम येथील पोलीस क्वार्टर मधे पीडित महिलेला बहाणा करून वंदना गवळी हिने नेऊन तिथे रात्री त्या पिडितेवर राजेश मोगरे यानी बलात्कार केला व कुणाकडे तक्रार केली तर ठार मारेन असे चाकू दाखवत धमकी दिली.
  आरोपी एवढ्या वरच न थांबता पीडित महिलेच्या पतीला फोन करून तुझ्या बायकोचे माझ्यासोबत संबंध आहे म्हणून त्याला सांगून पीडित महिलेला नवऱ्याकडून बेदम मारहाण करायला लावली.
  सतत होणाऱ्या पति व राजेश मोगरे कडून अत्याचाराला कंटाळून पीडित महिलेने रामनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.
  रामनगर पोलिसांनी भांदवी कलम 376, 109, 323, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ कार्यवाही करत आरोपी पोलिस शिपाई राजेश मोगरे व त्याला मदत करणारी महिला वंदना गवळी यांना अटक केली असून पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.