शहर पोलिसांची कार्यवाही
चंद्रपूर :- शहरातील गजबजलेले ठिकाण असलेल्या रामाळा तलाव परिसरात, मुख्य रहदारीच्या मार्गावर काही युवक चारचाकी वाहनात शस्त्रे घेऊन दहशत माजविण्याच्या प्रयत्न करत असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली त्यामुळे त्यांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली.
या प्रकरणात शहर पोलिसांनी 2 कोयते व 1 तलवार जप्त करीत 2 युवकांना अटक करण्यात आली व 2 युवक पळण्यात यशस्वी झाले.
यामध्ये आरोपी शुभम येनगंटीवार, साहिल शेख यांना अटक करण्यात आली असून सुशांत वाजपेयी, अविनाश पडोले यांचा शोध सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभागाचे नीलेश वाघमारे व विशाल कोरडे यांचेसह पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यवाही केली.